नेवासा शहरात जनता कर्फ्यूने शुकशुकाट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 18:16 IST2020-08-09T18:15:02+5:302020-08-09T18:16:23+5:30
नेवासा शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे आठ दिवसाच्या जनता कर्फ्युला रविवारी (९ आॅगस्ट) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शहरात शुकशुकाट जाणवत होता.

नेवासा शहरात जनता कर्फ्यूने शुकशुकाट...
नेवासा : शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे आठ दिवसाच्या जनता कर्फ्युला रविवारी (९ आॅगस्ट) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शहरात शुकशुकाट जाणवत होता.
नेवासा शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. शहरातील विविध भागात कोरोनाने आपला विळखा घातला आहे. शहरात रविवारपासून सुरू केलेल्या जनता कर्फ्युला व्यापारी व नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने पहिल्या दिवशी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व व्यापाºयांनी देखील आपले व्यवसाय बंद ठेवल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. शहरातून जाणाºया श्रीरामपूर-नेवासा फाटा रस्त्याने तुरळक वाहने दिसत होती.
नेवासा तालुक्यात २६ नवीन रुग्ण आढळले असून रुग्ण संख्या ३६७ वर गेली आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नेवासा शहरातील नऊ, सोनई येथील पाच, घोडेगाव येथील तीन, उस्थळ दुमाला येथील पाच, सलाबतपूर येथील एक, खेडलेकाजळी येथील दोन व भेंडा बुद्रुक येथील एकाचा समावेश आहे. रविवारपर्यंत तालुक्यातील २३४ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. आठ कोरोना बाधीत व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १२५ रुग्ण उपचार घेत आहे.