मयत सभासदांच्या वारसांना मयत निधीची तरतूद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:14+5:302021-06-20T04:16:14+5:30
या मागणीचे निवेदन सोसायटीचे सचिव स्वप्नील इथापे यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, ...

मयत सभासदांच्या वारसांना मयत निधीची तरतूद करावी
या मागणीचे निवेदन सोसायटीचे सचिव स्वप्नील इथापे यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद अर्जुन भुजबळ, श्रीराम खाडे, दत्तात्रय कसबे आदी उपस्थित होते. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची सभा दि. २७ जून रोजी होणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अनेक सभासद कोरोना व इतर कारणांनी मयत झाले आहेत. मयत सभासदांच्या घरातील कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा व उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झालेला आहे. काही सभासदांना पेन्शनही लागू नाही. शासनाची पीएफची रक्कम काढण्याची बीडीएस प्रणाली बंद आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पगाराव्यतिरिक्त इतर कोणतेही फरक बिल मिळण्यासाठी शासकीय अनुदान उपलब्ध नाही. त्यामुळे मयत बंधू-भगिनींचे कोणत्याही स्वरूपाचे फरक बिले मिळणे आता तरी शक्य नाही. मयतांच्या घरातील इतर सदस्यांचा सांभाळ करणे त्यांच्या दृष्टीने फार जिकिरीचे काम बनले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून मयत सभासद जेव्हापासून सेवेत हजर झाले, तेव्हापासूनची कायम ठेव, शेअर्स, वर्गणी सोसायटीकडे जमा आहे. सर्वांची ती हक्काची रक्कम त्यांना त्वरित मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सोसायटीने अनावश्यक खर्च न करता व इतर अनावश्यक खर्च टाळून मयतांच्या वारसांना मयत निधीची तरतूद करण्याच्या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने माध्यमिक शिक्षक सोसायटीत देण्यात आले.
---------------
फोटो - १९सोसायटी
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या मयत कर्मचारी सभासदांना त्यांच्या हक्काची शेअर्स, कायमठेव व वर्गणीची रक्कम द्यावी या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने विरोधी संचालक व सभासदांनी सोसायटीचे सचिव स्वप्नील इथापे यांना दिले.