प्रांताधिकारी हल्ला प्रकरण : दोन महिलांसह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:09 IST2018-09-19T12:09:46+5:302018-09-19T12:09:50+5:30
अद्याप तीन आरोपी फरार आहे.

प्रांताधिकारी हल्ला प्रकरण : दोन महिलांसह एकास अटक
श्रीगोंदा : प्रांताधिकारी गोविंद दाणेज, मंडलाधिकारी विलास आजबे व चालक नामदेव तांदळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी बनपिंप्री येथील वाळूतस्करीतील सहभागी महिला सुनिता दिलीप पठारे, शकुंतला दिलीप पठारे (बनपिंप्री) या दोन महिलांना श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. सुनिल दिलीप पठारे या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अन्य तीन आरोपी फरार आहेत.
श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सापळा लावून सुनीता पठारे व शकुंतला पठारे या दोन महिलांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज सकाळी सुनिल पठारे यास अटक केले. अद्याप तीन आरोपी फरार आहे.
रविवारी संध्याकाळी प्रांताधिकारी गोविंद दाणेज हे थिटे सांगवी शिवारात गेले होते. यावेळी पाठलाग करुन बनपिंप्री शिवारात वाळुचा एक टिपर पकडला. याचवेळी दोन महिला व चार पुरुषांनी तिघांवर सशस्त्र हल्ला करत तिघांना डांबून ठेवले. या प्रकरणाने महसुल यंत्रणेने दोन दिवस काम बंद आंदोलन केले. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी या विषयावर वादग्रस्त विधान केले होते.