महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:21 IST2021-03-08T04:21:14+5:302021-03-08T04:21:14+5:30

अहमदनगर : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील राणी सुलतान चांदबिबी यांच्या वंशज व स्पॅन महिला ऑग्रो टुरिजम संस्थेच्या प्रमुख ...

Provide employment opportunities to women | महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या

महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या

अहमदनगर : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील राणी सुलतान चांदबिबी यांच्या वंशज व स्पॅन महिला ऑग्रो टुरिजम संस्थेच्या प्रमुख अनिसा शेख यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना शुक्रवारी निवेदन दिले आहे. महिला सक्षमीकरणासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

अनिसा शेख या अहमदनगरच्या राणी सुलतान चांदबीबी यांच्या वंशज आहेत. शेख यांच्या संस्थेत सुमारे ९ हजार महिला सभासद आहेत. नवी मुंबईमधील खारघर हिलवर त्यांचा कृषी पर्यटन प्रकल्प आहे. तेथे वेगवगेळ्या प्रकारच्या वनस्पती, वृक्षलागवड, तसेच निसर्गाच्या रक्षणासाठी प्रयत्न होत आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास न करता, पर्यटनाला उभारणी देण्याची गरज असल्याचे मत अनिसा शेख यांनी व्यक्त केले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राच्या उभारणीसाठी राबविले जाणारे नावीन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत. मात्र, पर्यटन क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था अवलंबून आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील आदिवासी महिलांपासून शहरी भागातील सुशिक्षित महिलांनी रोजगाराच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याची मागणी शेख यांनी केली आहे.

आधी नोटाबंदी आणि नंतर कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. या दुहेरी संकटामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने विविध रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. याकरिता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी अनिसा शेख यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

--

फोटो- ०७अनिसा शेख

Web Title: Provide employment opportunities to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.