आरतीची निवड पाथर्डी तालुक्यासाठी अभिमानास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST2021-03-05T04:21:07+5:302021-03-05T04:21:07+5:30

टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील क्रिकेट खेळाच्या विकासासाठी व ग्रामीण खेळाडू घडविण्यासाठी एस.व्ही. क्रिकेट अकॅडमीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आरती केदार ...

Proud of Pathardi taluka for choosing Aarti | आरतीची निवड पाथर्डी तालुक्यासाठी अभिमानास्पद

आरतीची निवड पाथर्डी तालुक्यासाठी अभिमानास्पद

टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील क्रिकेट खेळाच्या विकासासाठी व ग्रामीण खेळाडू घडविण्यासाठी एस.व्ही. क्रिकेट अकॅडमीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आरती केदार हिने राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट संघात झालेली निवड ही सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आरतीने भविष्यात भारताच्या संघात स्थान मिळविण्यासाठी चांगली कामगिरी करावी व तालुक्याचा लौकिक वाढवावा, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी काढले. पाथर्डी तालुक्यातील हाताळा येथील आरती केदार हिची जयपूर येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सीनियर महिला संघात निवड झाली. याबद्दल ढाकणे यांनी आरतीच्या निवासस्थानी जाऊन सन्मान केला. यावेळी क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख व प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी, पोपट केदार, माजी सरपंच अनिल ढाकणे उपस्थित होते.

---

०४ आरती केदार

आरती केदार हिचा हाताळा येथे जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांनी सन्मान केला.

Web Title: Proud of Pathardi taluka for choosing Aarti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.