नगरमध्ये विडी कामगारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:59+5:302021-06-02T04:16:59+5:30

या आंदोलनात संघटनेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, कमलाबाई दोंता, शोभा पासकंठी, लक्ष्मी कोटा, ...

Protests by VD workers in the town | नगरमध्ये विडी कामगारांची निदर्शने

नगरमध्ये विडी कामगारांची निदर्शने

या आंदोलनात संघटनेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, कमलाबाई दोंता, शोभा पासकंठी, लक्ष्मी कोटा, शोभा बिमन, शारदा बोगा, निर्मला न्यालपेल्ली, संगीता कोंडा, सगुना श्रीमल, भाग्यलक्ष्मी गड्डम, सुमित्रा जिंदम आदींसह विडी कामगार महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

कोरोनाच्या टाळेबंदीत विडी कारखाने ४८ दिवसांपासून बंद असल्याने शहरातील चार ते पाच हजार विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. विडी कामगार आर्थिक दुर्बल घटक असून, विडी कामगारांचा उदरनिर्वाह विडी बनवून रोजच्या मजुरीवर चालत असतो. मात्र हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला आहे. सध्या टाळेबंदीत शिथिलता दिली जात असताना विडी कारखान्यांना कोरोनाचे नियम पाळून सकाळी ७ ते ११ पर्यंत परवानगी दिल्यास विडी कामगारांच्या हाताला काम मिळून त्यांचा प्रश्‍न सुटू शकणार आहे. तसेच या आर्थिक मंदीतून बाहेर येण्यासाठी विडी कामगारांना राज्य सरकारने दोन हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

ओळी-

विडी कारखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी व दोन हजार रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी लाल बावटा विडी कामगार युनियनच्यावतीने कामगारांनी निदर्शने केली. (छाया - वाजिद शेख - नगर)

Web Title: Protests by VD workers in the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.