रिपब्लिकन पक्षाची जामखेड तहसीलसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:28+5:302021-06-03T04:16:28+5:30
जामखेड : पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जामखेड ...

रिपब्लिकन पक्षाची जामखेड तहसीलसमोर निदर्शने
जामखेड : पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने बिघाडी करण्याचे काम केले आहे. हे दलित विरोधी सरकार असून या सरकारचे दिवस आता संपले आहेत. = आगामी काळात सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे.
पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारला घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष धरम घायतडक, युवा तालुकाध्यक्ष बाबा सोनवणे, युवा नेते सतीश साळवे, युवक तालुका उपाध्यक्ष बापू जावळे, देवा साळवे, जितू साळवे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
----
०२ जामखेड निवेदन
पदोन्नतीतील आरक्षण मिळावे याबाबतचे निवेदन जामखेड येथील तहसीलदारांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आले.