शासकीय निधीसाठी आरपीआयची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:48+5:302021-06-29T04:15:48+5:30
सर्व कल्याणकारी योजनांसाठी निधी मिळण्यासाठी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, आयटी ...

शासकीय निधीसाठी आरपीआयची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
सर्व कल्याणकारी योजनांसाठी निधी मिळण्यासाठी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, आयटी सेल संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष दिपक गायकवाड, माजी सरपंच युवराज पाखरे, विक्रम चव्हाण, प्रवीण वाघमारे, दया गजभिये, निखिल सूर्यवंशी, महादेव भिंगारदिवे, नितीन निकाळजे, संतोष सारसर, विवेक भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, वसंत भिंगारदिवे आदी आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या विकासाकरिता ज्या आर्थिक तरतुदी केलेल्या आहेत, अनुदान उपलब्ध होत नसल्याने त्या आर्थिक तरतुदीचा लाभ समाजाला मिळत नाही. मार्चमध्ये बजेट मंजूर होऊनही जून महिना आलेला आहे. परंतु राज्य सरकारने एकही पैसा विविध योजनांकडे वर्ग केला नसल्याचे दुर्दैव आहे. राज्य शासनाने तातडीने हा निधी द्यावा, अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.