इंधन दरवाढीच्या निषेधार्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:25 IST2021-02-25T04:25:56+5:302021-02-25T04:25:56+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव फाटा येथे बोअरवेल असोसिएशनने इंधन दरवाढीविरोधात १८ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात श्रीरामपूर, ...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ
श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव फाटा येथे बोअरवेल असोसिएशनने इंधन दरवाढीविरोधात १८ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, राहुरी येथील व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला.
व्यावसायिकांनी हरेगाव फाटा येथे सर्व गाड्या उभ्या केल्या आहेत. शांततेच्या मार्गाने तसेच सर्व सरकारी आदेशाचे पालन करत संप सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
व्यावसायिक आबासाहेब गवारे यांनी नवीन दरपत्रकानुसार बोअरवेलची आकारणी करावी, असे आवाहन केले. बाहेरच्या कार्यक्षेत्रातून एखादा व्यावसायिक परिसरात बोअरवेल घेत असेल तर त्यांनी प्रथम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी अन्यथा त्यांना ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा इशारा दिला. आंदोलनात सतीश सुलताने, अनिल बाराहाते, सागर चौधरी, अमोल चौधरी, गणेश चेडे, प्रवीण पाटील, नितीन फलके, योगेश थोरात, अजित कोकाटे, शुभम मखरे, नाथाभाऊ शिंदे, शेलागण बालम, सतीश मखरे, बाळासाहेब थोरात आदींनी सहभाग घेतला.
-------