संगमनेरात मराठा समाजाचे मंत्री, खासदार, आमदारांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST2021-05-06T04:21:37+5:302021-05-06T04:21:37+5:30

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. सर्वाेच्च न्यायालयाचा आम्ही आदर राखून केंद्र व ...

Protest of ministers, MPs and MLAs of Maratha community in Sangamnera | संगमनेरात मराठा समाजाचे मंत्री, खासदार, आमदारांचा निषेध

संगमनेरात मराठा समाजाचे मंत्री, खासदार, आमदारांचा निषेध

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. सर्वाेच्च न्यायालयाचा आम्ही आदर राखून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मार्गी न लागल्यास केंद्रातील व राज्यातील मराठा समाजाच्या सर्वच पुढाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने केली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात शरद थोरात, राजेंद्र मधुकर देशमुख, अमोल खताळ, अमोल कवडे, रमेश काळे आदी सहभागी झाले होते.

-------------

Web Title: Protest of ministers, MPs and MLAs of Maratha community in Sangamnera