तंबाखू कामगारांचा पाथर्डीत मोर्चा
By Admin | Updated: April 16, 2016 23:13 IST2016-04-16T22:59:02+5:302016-04-16T23:13:27+5:30
पाथर्डी : केंद्र सरकारने तंबाखू उत्पादनांवर घातलेल्या जाचक निर्बधामुळे कारखाने बंद होवून कामगारांना रोजगार मिळेनासा झाला आहे.

तंबाखू कामगारांचा पाथर्डीत मोर्चा
जाचक निर्बंधाचा निषेध : केंद्र शासनाविरुध्द घोषणा
पाथर्डी : केंद्र सरकारने तंबाखू उत्पादनांवर घातलेल्या जाचक निर्बधामुळे कारखाने बंद होवून कामगारांना रोजगार मिळेनासा झाला आहे. याच्या निषेधार्थ तंबाखू कामगारांनी शनिवारी पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चात केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
गाय छाप जर्दा कारखान्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात कामगार संघटनेचे अध्यक्ष मुश्ताक शेख, सुरेश भवार, गणेश खाडे, अंबादास घटे, रामा सुडके, शिला वायकर, मीरा नाळे, शाईनाज शेख आदींसह स्त्री व पुरूष कामगार मोठ्याा संख्येने सहभागी झाले होेते.
प्रशिक्षणार्थी तहसीलदार प्रज्ञा महांडुळे यांनी मोर्चेकऱ्यांकडून निवेदन स्वीकारले. तुमच्या भावना वरिष्ठांना कळविल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अशोक गर्जे, डॉ.अजित फुंदे, अमोल गर्जे, बद्रीलाल पलोड, व्यवस्थापक पाटील हजर होते.
शासनाने तंबाखू उत्पादनावर जाचक अटी लागू केल्यामुळे कारखानदारांनी कारखाने बंद केल्यामुळे रोजगार बंद झाल्याच्या निषेधार्थ कामगारांनी खासदार दिलीप गांधी यांना निवेदन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
कामगारांनी मांडल्या व्यथा
केंद्र शासनाने तंबाखू उत्पादनांवर घातलेल्या जाचक निर्बंधामुळे कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हजारो कामगार रोजगारापासून वंचित होतील. यापूर्वीच शासनाने तंबाखू उद्योगावर जाचक नियंत्रण लादले आहे. त्याला आम्ही विरोध केला नाही, परंतु अचानक ८५ टक्के इशाऱ्याच्या अतिरेकी नियमामुळे मात्र ग्रामीण भागात कोणतेही कौशल्य नसणाऱ्या अशिक्षीत स्त्री-पुरूषांना रोजगार देणारा तंबाखू उद्योग शासनाच्या या धोरणामुळे अडचणीत आहे. त्यामुळे एप्रिलपासून लागू करण्यात आलेला हा नियम रद्द करावा, अशी मागणी कामगारांनी यावेळी केली.