कल्पिता पिंपळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संगमनेरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:35+5:302021-09-02T04:45:35+5:30

संघटनेचे सरचिटणीस, संगमनेर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहायक कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, शिरीष तिवारी, ओंकार मिसाळ, जालिंदर ...

Protest against cowardly attack on Kalpita Pimple at Sangamnera | कल्पिता पिंपळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संगमनेरात निषेध

कल्पिता पिंपळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संगमनेरात निषेध

संघटनेचे सरचिटणीस, संगमनेर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, सहायक कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, शिरीष तिवारी, ओंकार मिसाळ, जालिंदर हिरे, योगेश मुळे, अल्पा देशमुख, धनश्री पैठणकर, अरविंद गुजर, बाळासाहेब कुळधरण, सुदाम सातपुते, वाल्मीक कापकर, राजेंद्र सुरग, प्रमोद लांडे आदी यावेळी उपस्थित होते.

३० ऑगस्टला संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या अतिक्रमणविरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा हातगाडी फेरीवाला अमरजीत यादव याने त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. झालेला प्रकार अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही, चिंताजनक बाब आहे. संघटनेच्या वतीने या गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करत आहोत, असे संघटनेचे सरचिटणीस पगडाल यांनी सांगितले.

Web Title: Protest against cowardly attack on Kalpita Pimple at Sangamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.