एक हजार बेडच्या जम्बो कोविड सेंटरचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:35 IST2021-05-05T04:35:36+5:302021-05-05T04:35:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगरमध्ये कोरोना रुग्णांसाठी एक हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहाला सादर ...

Proposal of one thousand bed Jumbo Covid Center | एक हजार बेडच्या जम्बो कोविड सेंटरचा प्रस्ताव

एक हजार बेडच्या जम्बो कोविड सेंटरचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : नगरमध्ये कोरोना रुग्णांसाठी एक हजार बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहाला सादर करणार असल्याचे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना सांगितले.

महापालिकेच्या वतीने शहरात एक हजार बेडचे एकाच ठिकाणी मोठे कोविड सेंटर सुरू करावे, अशी शहर काँग्रेसची मागणी आहे. याबाबत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आयुक्त गोरे यांची भेट घेऊन कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे हेही उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने काळे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णांना एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू न करता एकाच ठिकाणी एक हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करावे. जेणेकरून रुग्णांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यावर आयुक्त गोरे यांनी एक हजार बेडच्या कोविड सेंटरचा प्रस्ताव सभागृहाला सादर केला जाईल. सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर सेंटर सुरू करता येईल. प्रशासनाने प्रस्ताव सादर केल्यास त्यास तातडीने मंजुरी देण्याचे आश्वासन महापौर वाकळे यांनी दिले.

...

Web Title: Proposal of one thousand bed Jumbo Covid Center