संगमनेर महाविद्यालयातील आठ सहयोगी प्राध्यापकांची पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:36+5:302021-03-21T04:19:36+5:30
यात महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. रविंद्र ताशिलदार, डॉ. उमेश जगदाळे, मराठी विभागातील विभाग प्रमुख डॉ. ...

संगमनेर महाविद्यालयातील आठ सहयोगी प्राध्यापकांची पदोन्नती
यात महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. रविंद्र ताशिलदार, डॉ. उमेश जगदाळे, मराठी विभागातील विभाग प्रमुख डॉ. अशोक लिंबेकर, डॉ. राहुल हांडे, अर्थशास्त्र विभागातील डॉ. गोरक्षनाथ सानप, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुवर्णा बेनके, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना भवरे, लायब्ररी सायन्स विभागातील ग्रंथपाल डॉ. बबन चव्हाण यांचा समावेश आहे.
प्रोफेसर पदावर पदोन्नतीसाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी निर्गमित केलेल्या नियमानुसार सदर सहयोगी प्राध्यापक पीएच.डी.असणे व शोध पत्रिकेचे दहा लेख प्रकाशित होणे आवश्यक असते. या सर्व नियमांमध्ये पात्र झाल्यानंतर निवड समितीने महाविद्यालयातील आठ सहयोगी प्राध्यापकांना प्रोफेसर पदावर पदोन्नती देण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा .डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी म्हणाले, एकाच वेळी तब्बल आठ सहयोगी प्राध्यापकांना प्रोफेसर पदावर पदोन्नती मिळणे ही महाविद्यालयासाठी कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. महाविद्यालयास मिळालेला स्वायत्त दर्जा या दोन्ही गोष्टींमुळे महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख आणखीच उंचावला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.