१२० पदवीधरांना पदोन्नती
By Admin | Updated: August 4, 2014 00:43 IST2014-08-03T23:37:19+5:302014-08-04T00:43:33+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेत पद्वीधर शिक्षकांची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे.

१२० पदवीधरांना पदोन्नती
अहमदनगर : जिल्हा परिषदेत पद्वीधर शिक्षकांची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या दिवशी २ हजार ४०० पद्वीधर शिक्षकांपैकी तब्बल २ हजार २८० शिक्षकांनी पदोन्नती नाकारली. दरम्यान, दोन दिवसात ५१६ शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारली असून अद्याप ११० पदे रिक्त असून त्यासाठी सोमवारी ३ हजार पद्वीधरांना बोलविण्यात येणार आहे. रविवारी १२० शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे.
शनिवारपासून जिल्हा परिषदेत पद्वीधर शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी ३९६ तर दुसऱ्या दिवशी १२० अशा ५१६ शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारली आहे. यात २२८ शिक्षक भाषा विषयांचे, २६९ सामाजिक शास्त्र विषयाचे आणि १९ शिक्षक हे विज्ञान विषयाचे आहेत. शिल्लक ११० पदात भाषेची २४, विज्ञान विषयाचे ६५ आणि सामाजिक शास्त्र विषयाचे २१ पदे शिल्लक आहेत.
शिक्षण विभागाला विज्ञान विषयाची चिंता असून पद्वीधर शिक्षकांमध्ये विज्ञान विषय असणारे शिक्षक कमी आहेत. उर्दू माध्यमातील शिक्षकांचे आणि शिल्लक राहणाऱ्या पदांसाठी आज सोमवारी सेवा ज्येष्ठते प्रमाणे शिल्लक राहणाऱ्या सुमारे तीन हजार शिक्षकांना बोलविण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी दिली.
(प्रतिनिधी)
पदे भरण्याची शंका
पद्वीधर पदोन्नती प्रक्रियेत नगर, पारनेर आणि नेवासा या तालुक्यातील पदे जवळजवळ पूर्ण भरली आहेत. लांंबच्या तालुक्यांत पदोन्नती घेवून जाणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असल्याने सोमवारी पदोन्नतीचे सर्व पदे भरतील की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
मोठ्याप्रमाणात पद्वीधरांनी पदोन्नती नाकारल्याने त्याचा परिणाम उपशिक्षकांच्या जागांवर होणार आहे. यामुळे आंतर जिल्ह्याने बदलून येणाऱ्या शिक्षकांना आणखीन वाट पाहण्याची वेळ येणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होत आहे.