श्री गुरुदत्त मल्टीस्टेटला १ कोटी ३५ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:21 IST2021-04-08T04:21:42+5:302021-04-08T04:21:42+5:30

टाकळी ढोकेश्वर : वासुंदे (ता. पारनेर) येथील श्री गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेला ३१ मार्च, २०२१ या आर्थिक वर्षाअखेर ...

Profit of 1 crore 35 lakhs to Shri Gurudatta Multistate | श्री गुरुदत्त मल्टीस्टेटला १ कोटी ३५ लाखांचा नफा

श्री गुरुदत्त मल्टीस्टेटला १ कोटी ३५ लाखांचा नफा

टाकळी ढोकेश्वर : वासुंदे (ता. पारनेर) येथील श्री गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेला ३१ मार्च, २०२१ या आर्थिक वर्षाअखेर ढोबळ नफा १ कोटी ३५ लाख रुपये झाल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बा.ठ. झावरे यांनी दिली.

झावरे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही संस्थेच्या ठेवींमध्ये चालू आर्थिक वर्षात १४ कोटी रुपयांची वाढ झाली. संस्थेने मुख्य कार्यालयासह ७ शाखांच्या माध्यमातून अवघ्या ९ वर्षांच्या कालावधीमध्ये ५९ कोटी १५ लाख ठेवींचा टप्पा पार केला. कर्ज वाटप ४८ कोटी ४० लाख रुपये असून, संस्थेने विविध बँकामध्ये १४ कोटी ५१ लाख इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय १०८ कोटी रुपयांचा झाला आहे. मार्च अखेर थकबाकीचे व एनपीएचे प्रमाण अत्यल्प राखण्यात यश आले आहे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील सभासदांच्या सोयीसाठी नवीन शाखा सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस असून, संस्थांची लवकरच चितळे रोड, अहमदनगर येथे नवीन शाखा नगर शहरवासीयांच्या सेवेत सुरू होणार असून, सुपा, आळेफाटा आदी ठिकाणी शाखा सुरू करण्यात येणार आहे, असेही झावरे यांनी सांगितले. (वा. प्र.)

--

०७बी.टी. झावरे

Web Title: Profit of 1 crore 35 lakhs to Shri Gurudatta Multistate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.