पिंपळगाव जोगा आवर्तनसाठी आमदार औटी यांचे उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 13:12 IST2018-11-02T13:12:10+5:302018-11-02T13:12:15+5:30
पिंपळगाव जोगाचे आवर्तन २५ आॅक्टोबरमध्ये सुटूनही पारनेर तालुक्यात अजून पाणी आले नसल्याने पारनेरचे आमदार विजय औटी यांनी पिंपळगाव जोगा प्रकल्पात नारायणगाव येथे उपोषण सुरू केले आहे.

पिंपळगाव जोगा आवर्तनसाठी आमदार औटी यांचे उपोषण सुरू
पारनेर : पिंपळगाव जोगाचे आवर्तन २५ आॅक्टोबरमध्ये सुटूनही पारनेर तालुक्यात अजून पाणी आले नसल्याने पारनेरचे आमदार विजय औटी यांनी पिंपळगाव जोगा प्रकल्पात नारायणगाव येथे उपोषण सुरू केले आहे. पुणे जिल्ह्यातील लोकांनी पाणी उपसा सुरू केल्याने पारनेर तालुक्यातील आळकुटीच्या परिसरात कालवे कोरडेठाक आहेत. पुणे जिल्हा पारनेरचे पाणी पळवत असल्याने आमदार विजय औटी यांनी संबंधित अधिका-यांवर कारवाई करावी, पारनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे म्हणून उपोषण सुरू केले आहे.