अधिकाऱ्यांना बराेबर घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:27+5:302021-07-23T04:14:27+5:30
खर्डा : ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. या माध्यमातून तालुक्यातील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन खर्डा ...

अधिकाऱ्यांना बराेबर घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणार
खर्डा : ‘आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. या माध्यमातून तालुक्यातील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन खर्डा येथे येऊन सर्वसामान्यांचे प्रश्न जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न दर चार महिन्यांनी केला जाईल, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली.
खर्डा (ता. जामखेड) येथे बुधवारी आयोजित ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कृषी अधिकारी सुधीर शिंदे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, भूमी-अभिलेख विभाग अधिकारी मनीषा धीवर, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कासलीवाल, गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.
परिसरातील चोवीस गावातील ग्रामस्थांनी पाणंद रस्ते, अनेक जागांवर झालेले अतिक्रमण, शिव रस्ते, पाण्याचा प्रश्न, वीजप्रश्न आदी प्रकारची निवेदने दिली. त्यांच्या विविध समस्या मांडल्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, वैभव जमकावळे, दादा जावळे, अशोक खटावकर, कपिल लोंढे, कल्याण सुरवसे, संतोष लष्करे, अभय गोलेकर, ज्ञानदेव इंगवले, शिवाजी भोसले, कैलास गोलेकर, सुहास पाटील, हरी गोलेकर आदी उपस्थित होते.