मुंगुसगाव - विसापूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:39+5:302021-09-03T04:21:39+5:30
बुधवारी (दि.१) तहसीलदार चारुशीला पवार यांनी मंडल अधिकारी मिलिंद जाधव, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप जगताप व ...

मुंगुसगाव - विसापूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार
बुधवारी (दि.१) तहसीलदार चारुशीला पवार यांनी मंडल अधिकारी मिलिंद जाधव, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप जगताप व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांच्या समवेत या रस्त्याची पहाणी केली. यावेळी सध्या या रस्त्यावर फारशी अतिक्रमणे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, काही शेतकऱ्यांनी रस्त्याकडेला काट्या टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्यांना काम सुरू करण्यात अडचण आली होती. बुधवारी तहसीलदार पवार यांनी रस्त्याची पहाणी करून काम सुरू करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाचे अधिकाऱ्यांना केल्या. हा रस्ता गाव नकाशात साडेसात मीटरचा असून त्याप्रमाणे काम पूर्ण करण्यात यावे. कोणत्याही व्यक्तीने अडथळा निर्माण आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच मंदा लोंढे, उपसरपंच महेश टकले, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजय जठार, माजी सरपंच रामदास कानगुडे आदी उपस्थित होते.
..............
मुंगुसगाव- विसापूर या रस्त्याची मी समक्ष पहाणी केली. या रस्त्याचे काम सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्यांच्या स्तरावर काम सुरू करावे. याबाबत कोणी अडथळा निर्माण केला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-चारुशीला पवार, प्रभारी तहसीलदार, श्रीगोंदा
................
मुंगुसगाव - विसापूर या रस्त्याची आखणी करून आठवडाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.
-दिलीप जगताप, उपअभियंता, जिल्हा परिषद.