खासगी रुग्णालयांनी दरपत्रक फलक लावावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:29+5:302021-04-29T04:16:29+5:30
प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, सचिव प्रकाश बेरड, सल्लागार मालोजी शिकारे, उपाध्यक्ष देवीदास येवले आदींनी बुधवारी जिल्हाधिकारी राजेंद्र ...

खासगी रुग्णालयांनी दरपत्रक फलक लावावेत
प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, सचिव प्रकाश बेरड, सल्लागार मालोजी शिकारे, उपाध्यक्ष देवीदास येवले आदींनी बुधवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले. जिल्हा प्रशासन त्यांच्या परीने कोरोना रुग्णांसाठी चांगले काम करत आहे. काही खासगी रुग्णालयेही चांगली सेवा देत आहेत. परंतु काही रुग्णांमध्ये सामान्य रुग्णांची पिळवणूक होत आहे. अवाजवी बिले आकारली जात आहेत, तसेच रुग्ण दाखल होण्यापूर्वी डिपॉझिटची मागणी केली जात आहे. मुळात अशा रुग्णालयांबाहेर कुठल्याही प्रकारच्या दरपत्रकाचे फलक लावण्यात आलेले नाही, हे शासकीय आदेश आणि नियमांचे उल्लंघन आहे. याबाबतचे पुरावेही आपल्याकडे उपलब्ध आहेत. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचेसुद्धा याकडे लक्ष नाही. त्यामुळे आपण सर्व खासगी कोविड सेंटर यांना सूचना देत तत्काळ दरपत्रकाचे फलक दर्शनी भागात लावण्याच्या लेखी सूचना कराव्यात, अन्यथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सूचनेद्वारे अजय महाराज बारस्कर तसेच राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक पवित्रा घेऊन स्वतः प्रत्येक हॉस्पिटलसमोर असे दरपत्रकाचे फलक लावेल याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
---------
फोटो मेल वर
२८प्रहार जिल्हाधिकारी भेट
खासगी रुग्णालयांनी दरपत्रक लावावेत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देताना प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी. समवेत कार्यकर्ते.