पाथर्डी शहरानजीक खासगी बस, टेंपो अपघातात दोनजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:36 IST2018-02-27T18:36:03+5:302018-02-27T18:36:14+5:30
पाथर्डी शहरानजीक खासगी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

पाथर्डी शहरानजीक खासगी बस, टेंपो अपघातात दोनजण ठार
पाथर्डी : खासगी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पाथर्डी शहरानजीक माळीबाभूळगाव हद्दीत मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मृतांमध्ये सोपान ढाकणे (वय ३२, रा.परभणी),परमेश्वर लोखंडे (वय ३०, रा. रुई ता.गेवराई) या चालकांचा समावेश आहे.
नगरहून येणारी खाजगी बस व बीड कडून येणा?्या मालवाहक आयशर टेम्पो यांच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोनही वाहनांचे चालक जागीच ठार झाले आहेत.
खासगी बस नगरहून येत होती तर टेंम्पो बीडकडून येत होता. माळीबाभूळगाव हद्दीत या दोन वाहनांमध्ये जोराची धडक झाली. यामध्ये बस चालक सोपान ढाकणे व टेम्पो चालक परमेश्वर लोखंडे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पोलीस हवालदार अरविंद चव्हाण, संजय अकोलकर, पो.कॉ.नईम पठाण, पोलीस नाईक वाल्मिक पारदी व ग्रामस्थांनी बसमधील जखमींना रुग्णालयात हलविले. ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही वाहनाचा दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन दोन्ही चालकाचे मृतदेह केबिनमध्ये अडकले होते. पोलिस व स्थानिक नागरिक विकास राठोड यांनी तीन तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह व वाहने रस्त्यावरून जेसीबीच्या साह्याने बाजूला काढले. तालुक्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या नुतनीकरणासाठी दीड वर्षापासून खोदून ठेवल्याने या रस्त्याने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहेत.सरासरी आठवड्याला अपघात होत असल्याने हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे.