वाहतूक, नागरिक, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:57+5:302020-12-22T04:20:57+5:30
जामखेड : शहरातील वाहतूक, पार्किंग, नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षाविषयक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी ...

वाहतूक, नागरिक, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य
जामखेड : शहरातील वाहतूक, पार्किंग, नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षाविषयक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.
जामखेड शहरात व्यापारी, नागरिक, पाेलीस प्रशासन यांच्या बैठकीवेळी ते बोलत होते. पोलीस प्रशासनाकडून नागरिक, व्यापारी यांना काय अपेक्षित हे त्यांनी जाणून घेतले. तालुक्याचा विस्तार आणि शहराची लोकसंख्या पाहता पोलीस बळ अत्यल्प आहे. त्यासाठी जोपर्यंत व्यापारी, नागरिक पुढे होऊन पोलीस प्रशासनाला मदत करत नाहीत तोपर्यंत ठोस पावले उचलता येत नाहीत. यासाठी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही बसवावेत. आपापल्या भागात, पेठेत, व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन रात्री रखवालदार ठेवणे, पार्किंगच्या बाबतीत काळजी घेण्याचे आवाहन यावेळी गायकवाड यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अगोदर पार्किंगची पर्यायी व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. शहरात काही महिन्यांपूर्वी झालेल्या चोऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही अद्याप दुकानदारास मुद्देमाल मिळाला नाही. मेन रोडवरील अतिक्रमण पाहता निम्म्याहून कमी रस्ता वापरात आहे. तसेच बीड रोड कॉर्नरसारख्या ठिकाणांवर बरेच टवाळखोर मुले, रस्त्याला अडथळा करत मोटारसायकल आडवी लावून उभी असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी कोठारी यांनी केली.
मंगेश आजबे म्हणाले, शेतकऱ्यांवर बऱ्याच वेळेस अन्याय होत आहे, त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. शहानिशा करूनच ट्रीपल सीट दुचकीस्वारांवर कारवाई करावी. कृष्णा आहुजा, सुनील जगताप, संतोष नवलाखा, विकी घायतडक, अमित चिंतामणी यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, नगर परिषदेचे अधिकारी शेळके, पवन राळेभात, कापड असोसिएशनचे अध्यक्ष संजय कटारिया, मोबाइल असोसिएशनचे सुनील जगताप, उमेश नगरे, ऋषिकेश चिंतामणी, अमोल तातेड, विकी सदाफुले, अमोल लोहकरे, विशाल अब्दुले, सोमनाथ पोकळे, आनंद गुगळे, अनुराग गुगळे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, मनोज भंडारी, विजय अहुजा, तुषार बोरा, हरिश्चंद्र राळेभात, शिवकुमार डोंगरे, सलीम सय्यद, अरविंद पारख, महादेव गव्हाणे, प्रशांत हिरवे, बजरंग सरडे, अजय अवसरे, अविनाश ढेरे आदी उपस्थित होते.