विवेक कोल्हेंकडून सत्कार्याला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:56+5:302021-05-27T04:21:56+5:30
संजीवनी कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व यंत्रणा उभी करुन रुग्णांची ...

विवेक कोल्हेंकडून सत्कार्याला प्राधान्य
संजीवनी कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व यंत्रणा उभी करुन रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तालुक्यातील युवकांनी कोल्हे यांचा सत्कार आयोजित केला होता. मात्र ज्या दिवशी मतदारसंघ कोरोनामुक्त होईल, त्याच दिवशी आपण सत्कार बाबत विचार करु तसेच सध्याची वेळ ही सत्काराची नसून सत्कार्याची आहे, असे विवेक कोल्हे यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे युवकांना उभारी व प्रेरणा मिळाली असे येवले म्हणाले.
कोल्हे म्हणाले, खरा सत्कार कोरोनात अहोरात्र लढणारे प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स,वैद्यकीय कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,पोलीस अधिकारी यांचा करायला हवा. तेव्हाच आपण खरी लढाई जिंकल्याचे सर्वांना समाधान होईल. रुग्णसेवेच्या माध्यमातून दुर्दैवाने संक्रमण झालेल्या रुग्णांना उपचारासोबतच मानसिक आधाराची ही खरी गरज आहे. आपण प्रत्येकजण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेने कार्य केल्यास कोरोना नक्कीच हद्दपार होईल असा विश्वासही या वेळेस कोल्हे यांनी व्यक्त केला.
---