नोकरभरती व संचमान्यता मार्गी लावण्यास प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:00+5:302021-07-17T04:18:00+5:30

मागील नऊ वर्षात शारीरिक शिक्षकांच्या नऊ जागाही भरल्या नाहीत. त्यामुळे बेरोजगार खेळाडू, पदवीधरांची संख्या वाढत चालली असून ते नैराश्येतून ...

Prioritize recruitment and team management | नोकरभरती व संचमान्यता मार्गी लावण्यास प्राधान्य द्या

नोकरभरती व संचमान्यता मार्गी लावण्यास प्राधान्य द्या

मागील नऊ वर्षात शारीरिक शिक्षकांच्या नऊ जागाही भरल्या नाहीत. त्यामुळे बेरोजगार खेळाडू, पदवीधरांची संख्या वाढत चालली असून ते नैराश्येतून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे टोकाचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे शिक्षक भरती तातडीने करण्यात यावी, संचमान्यतेतील त्रुटी दूर करून नवीन निकष लागू करून शारीरिक शिक्षण शिक्षकाला संचमान्यतेत सामावून घेण्यात यावे, निवडश्रेणीसाठी अटीत बदल करण्यात यावा, नवीन शैक्षणिक धोरण समितीत शारीरिक शिक्षण शिक्षक प्रतिनिधी असावा यासह विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना सादर केले.

संचमान्यता, नोकरभरती याबाबत शासन सकारात्मक असून प्राधान्यक्रमाने हे विषय मार्गी लावू व लवकरच या संदर्भात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन मंत्री गायकवाड यांनी शिष्टमंडळास दिले.

शिष्टमंडळात मच्छिंद्र ओव्हाळ, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिल सपकाळ, विलास शिंदे, वैभव वाघमारे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते. पुढील विविध मागण्यांसाठी राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ शिक्षणमंत्र्यांना भेटणार असल्याचे घनःशाम सानप यांनी सांगितले.

-----------

फोटो - १६ स्पोर्टस

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देताना आमदार जयंत आसगावकर, मच्छिंद्र ओव्हळ व पदाधिकारी.

Web Title: Prioritize recruitment and team management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.