हॉटेलवर छापा
By Admin | Updated: August 13, 2015 23:09 IST2015-08-13T22:54:43+5:302015-08-13T23:09:06+5:30
संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर साकूर फाटा येथे विना परवाना अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून दारुसह ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़

हॉटेलवर छापा
संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर साकूर फाटा येथे विना परवाना अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून दारुसह ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी हॉटेल मालकाविरूध्द घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची माहिती अशी, महामार्गावरील साकूर फाट्यावर ‘हॉटेल विसावा’मध्ये विना परवाना अवैध दारूची विक्री होत असल्याची गुप्त खबर पोलीस उपअधीक्षक अजय देवरे यांना मिळाली. त्यानुसार देवरे यांनी बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकासह हॉटेलवर अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान इनोव्हा कारमध्ये (क्रमांक एम.ए.१२, डी.ई.६८०६) विदेशी दारूच्या बाटल्या गोण्यांमध्ये भरून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी इनोव्हासह दारू जप्त केली. कारवाईतील मुद्देमालाची किंमत ६ लाख १२ हजार इतकी आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल फिरोज पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी हॉटेल मालक बबन मुरलीधर गांजवे (रा. पिंपळगाव देपा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
(प्रतिनिधी)