कुकाण्यात बिंगो जुगारावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:27+5:302021-09-02T04:47:27+5:30

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१ सप्टेंबर रोजी नेवासा ...

Print on bingo gambling in Kukana | कुकाण्यात बिंगो जुगारावर छापा

कुकाण्यात बिंगो जुगारावर छापा

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१ सप्टेंबर रोजी नेवासा पोलीस ठाणे हृद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करत असताना पोहेकॉ विजयकुमार वेठेकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कुकाणा गावामध्ये हॉटेल पारखच्या आडोश्याला नितिन शिवाजी धोत्रे हा त्याचे हस्तकामार्फत बिंगो नावाचा जुगार कॉम्युटरवर डाऊनलोड करून लोकांना जमवून खेळ खेळत आहेत. त्यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर देवकाते व यांना मदतीकामी सोबत घेऊन त्या ठिकाणी गेलो असता १२ ते १३ जण हे कॉम्युटरवर बिंगो नावाचा जुगार खेळतांना दिसले. त्यावेळी तेथे छापा टाकला व जुगार खेळत असलेले भागवत गिनदेव वनवे (वय २१, रा. आखारबाग पाथर्डी,लक्ष्मण बबन मासाळकर (वय २० रा. नाथनगर, पाथर्डी,सचिन रामू साळवे (वय-२० रा.तेलकुडगाव, ता. नेवासा),संजय कुंडलिक घाडगे (वय ३२ रा. तेलकुडगाव, ता. नेवासा), गणेश मोहन वाबळे (वय २६, रा. अंतरवली, ता. नेवासा), नामदेव रामभाऊ सरोदे (वय ३१ रा.अंतरवली, ता. नेवासा), स्वप्नील सुभाष गोर्डे (वय ३६, रा.कुकाण, ता. नेवासा ), विलास एकनाथ आहेर (वय ३१, रा.दहेगावने ता.शेवगाव),संकेत विजू गर्जे (वय १९, रा. वडुले ता. नेवासा), अशोक विठ्ठल चावरे (वय ३०, रा. दहेगावने, ता. शेवगाव),संदीप हरीभाऊ काळे (वय ४०, रा. तेलकुडगाव, ता. नेवासा), अंकुश उत्तम घुटे (वय २७, रा. कुकाणा, ता. नेवासा) व मालक नितिन शिवाजी धोत्रे (रा. विजयनगर,पाथर्डी) अशी पकडलेल्या इसमांची नावे आहेत.

पकडलेल्या तेरा जणांकडून मोबाइल, रोख रक्कम असा ८७ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वरील १३ जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Print on bingo gambling in Kukana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.