प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:54+5:302021-07-08T04:14:54+5:30
डॉ. गायकवाड हे गेल्या ३२ वर्षांपासून महाविद्यालयात वाणिज्य विभागात कार्यरत असून, वाणिज्य विभाग प्रमुख, उपप्राचार्य तसेच १ जुलै २०२० ...

प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांची निवड
डॉ. गायकवाड हे गेल्या ३२ वर्षांपासून महाविद्यालयात वाणिज्य विभागात कार्यरत असून, वाणिज्य विभाग प्रमुख, उपप्राचार्य तसेच १ जुलै २०२० पासून संगमनेर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ. गायकवाड यांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये उत्कृष्ट शिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन्मानित केले आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा ‘समता सैनिक’ पुरस्कारानेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस लॉ बोर्डाचे ते विद्यमान अध्यक्ष असून, व्होकेशनल कॉमर्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्यापरिषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यास मंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य इ. अधिकार मंडळांवर ते शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये जवळपास ८३ लेख व ३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.