गुरुमाऊलीच्या अध्यक्षपदी राजकुमार साळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:15+5:302021-03-13T04:37:15+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधारी गुरुमाऊली शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी शिक्षक संघाचे ...

Prince Salve as the President of Gurumauli | गुरुमाऊलीच्या अध्यक्षपदी राजकुमार साळवे

गुरुमाऊलीच्या अध्यक्षपदी राजकुमार साळवे

अहमदनगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधारी गुरुमाऊली शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी शिक्षक संघाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजकुमार साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्याकडे दोन पदे असल्याने मंडळाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर साळवे यांची निवड करण्यात आली.

शिक्षक संघ आणि गुरुमाऊली मंडळाचे त्रैवार्षिक अधिवेशन कोरोनामुळे लांबणीवर पडल्याने आणि शिक्षक संघाचे भव्य त्रैवार्षिक अधिवेशन घेऊनच लोकशाही पद्धतीने निवड करण्याचा आदेश राज्य संघाने दिला होता. त्यामुळे जिल्हा गुरुमाऊली मंडळाच्या निवडीसाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. सुमारे तीन तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांनी शिक्षकांची मते जाणून घेतली. गुरुमाऊली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई आढाव यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी राजकुमार साळवे यांच्या नावाची सूचना मांडली. त्याला विद्यमान कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर कुलट यांनी साळवे यांची निवड जाहीर केली. यावेळी अण्णासाहेब आभाळे, कैलास सहाणे, बाळासाहेब तापकीर, शरद सुद्रीक, संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, सलीमखान पठाण, बाबा खरात, सुयोग पवार, बँकेचे अध्यक्ष राजू राहणे, शिक्षक नेते आर. टी. साबळे, अंजली मुळे, यास्मिन शेख, मनिषा कोथिंबिरे, मिनाक्षी अवचरे, विठ्ठल काळे, पुंडलिक सोनवणे, अशोक गिरी, पी. डी. सोनवणे, आबासाहेब दळवी, सोमनाथ गळंगे, सूर्यकांत काळे, बाबाजी डुकरे, नितीन पंडित, सुरेश निवडुंगे, मंगेश खिलारी, रामेश्वर चोपडे, विजय ठाणगे, निवृत्ती गोरे, किशोर माकुडे, विलास गवळी, शशिकांत जेजुरकर, अमोल मांगुडे, सुनील गायकवाड, संतोष वाघमोडे, शकील बागवान, नितीन कोळसे, बेनहर वैरागर, सरदार पटेल, विठ्ठल काकडे, शिवाजी वाघ, गोरक्ष विटनोर, मच्छिंद्र लोखंडे, पुंजाहरी सुपेकर, वाघोजी पटारे, सुरेश शिरोळे, विजय नरवडे आदी ऑनलाईन उपस्थित होते.

...........................

जिल्हा संघ व गुरुमाऊली मंडळाचे त्रैवार्षिक अधिवेशन घेऊन या निवडी ७ मार्च रोजी जाहीर करण्याचे निश्चित झाले होते. माझ्याकडील एका पदाचा त्याग करत ऑनलाईन पद्धतीने गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी त्रैवार्षिक अधिवेशनात जाहीर करण्यात येईल.

- बापूसाहेब तांबे, नेते, गुरुमाऊली मंडळ

........

११ राजकुमार साळवे

Web Title: Prince Salve as the President of Gurumauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.