पंतप्रधान नरेंद्र मोदी नापास, मोदींनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:56+5:302021-06-09T04:26:56+5:30
दिवसागणिक वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किमतीविरोधात संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर बोटा येथील पेट्रोल पंपाबाहेर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसतर्फे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी नापास, मोदींनी राजीनामा द्यावा
दिवसागणिक वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किमतीविरोधात संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर बोटा येथील पेट्रोल पंपाबाहेर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसतर्फे सोमवारी सकाळी करण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलने तर रेकॉर्डब्रेक प्रतिलिटर १०० रुपयांचा टप्पा पार करत महागाईच्या आगीत फोडणी टाकली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, पठार भाग युवा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुऱ्हाडे, सरपंच सोनाली शेळके, वैशाली पावडे, तेजश्री माळी, अनिता माळी, उपसरपंच पांडू शेळके, अरुण वाघ, संपत आभाळे, यशवंत शेळके, विकास शेळके, सुहास वाळुंज, बबन कुऱ्हाडे, बापू जाधव, सुहास आहेर, गणेश लेंडे, संदीप आभाळे, संदीप शेळके, प्रमोद कुरकुटे, निखिल कुरकुटे, नवनाथ आहेर, चेतन कजबे, अजित मोरे, राजेंद्र जठार, डॉ. सचिन मुसळे, मुनीर शेख, पप्पू चौगुले, दत्तात्रय काळे आदींची उपस्थिती होती.
पुढे तांबे म्हणाले, कोरोनाच्या काळात केंद्र सरकार चुकीचे वागले आणि देशातील सामान्य माणसांचे त्यामुळे प्रचंड हाल झाले. कोरोनाचे संकटात मोदी सरकार उशिरा जागे झाले. केंद्र सरकार आरोग्याच्या प्राथमिक सोयी नागरिकांना उपलबध करून देऊ शकले नाही. कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे म्हणाले, मोदी सरकारने शेतमालाला हमीभाव दिला नाही, नोटबंदीने अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. काळा पैसा येईल म्हणून हा उपद्व्याप केला होता; पण काळा पैसा आला नाही. प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख येतील, अशी खोटी आश्वासने दिली. उलट उद्योगधंदे बुडाले, शेती उद्ध्वस्त झाली. लाखो रोजगार गेले, बेरोजगारी वाढली.
------
फोटो - आहे
070621\img20210607103752.jpg
वाढत्या इंधनाच्या किंमतीविरोधात संगमनेर तालुक्यातील नाशिक–पुणे महामार्गावर बोटा येथील पेट्रोल पंपाबाहेर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.