संगमनेरात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:04 IST2017-08-21T16:04:18+5:302017-08-21T16:04:55+5:30
संगमनेर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत कायम ठेवीतून रक्कम काढण्याचा ठराव सत्ताधारी संचालक मंडळाने करण्याचा प्रयत्न केल्यास संचालकांना कायमची शाखा बंद करू, असा इशारा बँक बचाव कृती समितीचे निमंत्रक शिवाजी दुशिंग यांनी दिला आहे.

संगमनेरात धरणे आंदोलन
ठळक मुद्देशिक्षक बँक : बचाव कृती समिती कायम ठेवीतून विकास मंडळासाठी १० हजार रुपयांची कपात करण्याचा डाव
श क्षक बँक : बचाव कृती समितीसंगमनेर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत कायम ठेवीतून रक्कम काढण्याचा ठराव सत्ताधारी संचालक मंडळाने करण्याचा प्रयत्न केल्यास संचालकांना कायमची शाखा बंद करू, असा इशारा बँक बचाव कृती समितीचे निमंत्रक शिवाजी दुशिंग यांनी दिला आहे. शिक्षक बँक बचाव कृती समिती संगमनेर शाखेच्यावतीने विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी सदिच्छा मंडळाचे नेते माधव हासे, कैलास वर्पे, संतोष दळे, गुरुकुलचे नेते बाळासाहेब जाधव, संदीप मंडलिक, पंढरीनाथ घुले, रमेश आहेर, गोकुळ कहाणे, नेते गौतम मिसाळ, राजेंद्र कडलग, सुनील कुलांगे, रवींद्र अनाप, राजेंद्र कुदनर, दत्ता जोंधळे आदी उपस्थित होते. माधव हासे म्हणाले, कायम ठेवीतून विकास मंडळासाठी १० हजार रुपयांची कपात करण्याचा डाव हा सभासदांच्या पैशावर सत्ताधारी मंडळाने दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे. तो यशस्वी होऊ देणार नाही. ठेवीवर ८.५ टक्के व्याज देता, कर्जाचा व्याजदर १३ टक्के घेता हा कसला कारभार चालू आहे. सभासदांच्या कायम ठेवीवर पाच टक्के बँक व्याज देते. विकास मंडळाने निधी दिल्यास १३ टक्के व्याज देण्याचे गाजर दाखविले जाते. मग बँकच कायम ठेवीवर जादा व्याज का देऊ शकत नाही?, असा सवाल हासे यांनी केला आहे. धरणे आंदोलनात शैलजा राहाणे, सविता भुसाळ, वृषाली कडलग, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश थोरात, चंद्रकांत कर्पे, अशोक गिरी, अनिल कडलग, सुभाष खेमनर, राजेंद्र कुदनर, बाळासाहेब जाधव, अण्णा कांदळकर, पोपट काळे, अशोक गडाख, उत्तम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.