कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठविणाऱ्या मान्यवरांचा गौरव
By Admin | Updated: October 2, 2014 00:34 IST2014-10-02T00:29:12+5:302014-10-02T00:34:03+5:30
अहमदनगर : सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट आणि लोकमतच्या वतीने आयोजित ‘जल्लोष सूर तालांचा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला़

कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठविणाऱ्या मान्यवरांचा गौरव
अहमदनगर : सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट आणि लोकमतच्या वतीने आयोजित ‘जल्लोष सूर तालांचा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला़ यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठविणाऱ्या मान्यवरांचा सूर्यदत्ता एक्सलंसी अॅवार्ड देऊन गौरव करण्यात आला़
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संतोष बोथरा, (औद्योगिक), राजेश गुगळे (यंग अचिव्हर), डॉ़ सुचेता धामणे (सामाजिक कार्य), संजय धोपावकर (ज्युडो-स्पोर्टस), विलास गिते (साहित्य), डॉ़ सुधा कांकरिया (बेटी बचाव), पवन नाईक (संगीत), मेधाताई काळे (बँकिंग), बेबीताई गायकवाड (महिला सशक्तीकरण) यांना सूर्यदत्ता एक्सलंसी अॅवार्ड देवून गौरविण्यात आले़ यावेळी बोलताना ‘सूर्यदत्ता’चे अध्यक्ष संजय चोरडिया म्हणाले की, समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठविणाऱ्या व्यक्तींचा गौरव करूनही आपणही समाजाचे देणे लागतो़ अशा उपक्रमातून व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची ओळख होते़ असे सांगत चोरडिया यांनी संस्थेची १६ वर्षाची वाटचाल व उपक्रमाविषयी माहिती दिली़ यावेळी लोकमतचे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्ती प्रमुख अनंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
मैफिलीत रंगले नगरकर
कार्यक्रमादरम्यान शहरातील रसिकांसाठी आयोजित संगीत स्वर मैफिलीत नगरकर रंगून गेले़ त्यागराज खाडीलकर, प्रियंका बर्वे आणि प्रशात नासेरी यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांची मने जिंकली़ यावेळी ड्रिमर्स डान्स अकॅडमीच्या आकाश मुनफन यांनी नृत्य सादर केले़ अंबरीश जहागिरदार, बंटी शोजवळ, हर्षद भावे, सौरभ मेहंदळे यांनी संगीत साथ दिली़