पालेभाज्यांचे दर पुन्हा वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST2021-08-12T04:24:37+5:302021-08-12T04:24:37+5:30
अहमदनगर : जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. बाजारात आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भावही कमी झाले आहेत. ...

पालेभाज्यांचे दर पुन्हा वाढले
अहमदनगर : जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. बाजारात आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भावही कमी झाले आहेत. मात्र तीन आठवड्यांपासून पावसाने दडी दिल्याने महिनाभरापूर्वी लागवड केलेल्या भाज्या आता सुकल्या आहेत. परिणामी बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत असून भाज्यांचे दर पुन्हा वाढत आहेत.
अहमदनगर शहरात गेल्या १५ दिवसांमध्ये भाज्यांचे दर खूपच कमी झाले होते. पालेभाज्यांच्या जुड्या ५ ते १० रुपयांनाच मिळत होत्या. इतर भाज्याही स्वस्त झाल्या होत्या. नगर शहरात कोणत्याही बाजारात गेले तरी स्वस्त भाजी झाल्याने नागरिक सुखावले होते. मात्र सध्या पावसाने पाठ फिरवली आहे. काही भाज्या सुकल्या आहेत. उत्पादन कमी झाल्याने आवकही कमी झाली आहे. त्यात उपलब्ध भाजीपाला इतर जिल्ह्यात जात असल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे पालेभाज्या ५ रुपयांनी महाग झाल्या आहेत.
-----------
पालेभाज्यांचे भाव (प्रतिजुडी)
भाजी जून ऑगस्ट
मेथी १० २०
कोथिंबिर १० १५
पालक २० १५
चुका १० १५
पुदिना १० २०
शेपू १० ५
बटाटे १५ २०
----
विक्रेते म्हणतात..
सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. आधीच कमी भाज्या, त्यात परजिल्ह्यात माल जात असल्याने आता पुन्हा भाज्यांचे दर वाढत आहेत.
- नरेंद्र देशमुख, सावेडी
---------
पाऊस असला की भाज्यांचे दर कमी होतात. सध्या पाऊस नसल्याने महिनाभरापूर्वी लागवड केलेल्या भाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाज्यांचे दर वाढले आहेत.
-शरद बोबडे, पाईपलाईन रोड
------