दूध दरवाढीसाठी तहसीलवर मोर्चा
By Admin | Updated: November 28, 2014 01:14 IST2014-11-28T00:37:02+5:302014-11-28T01:14:02+5:30
राहुरी : दूध उत्पादक कमी भाव मिळत असल्याने मेटाकुटीला आले आहेत.

दूध दरवाढीसाठी तहसीलवर मोर्चा
राहुरी : दूध उत्पादक कमी भाव मिळत असल्याने मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे शासनाने हे दर वाढवून द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढला. आठ दिवसांत शासनाने दुधाला भाव वाढवून दिला नाही, तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला़
राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवि मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दुपारी मिशन कं पौंडमधून घोषणा देत राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा नेण्यात आला़ मोर्चाच्या वतीने राजूभाऊ शेटे यांनी तहसीलदार राजश्री आहिरराव यांना मागण्यांचे निवेदन दिले़ दुधाला ३५ रूपये भाव, दूध भुकटीला अनुदान, सुगंधी दुधाचे शाळेत वाटप, प्रतिलिटर ५ रूपये अनुदान अशा मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या़
मोर्चासमोर राजूभाऊ शेटे, प्रकाश देठे, रविंद्र म्हसे, संदीप खुरूद, अविनाश साळुंके, बाळासाहेब जाधव, इंद्रभान पेरणे यांची भाषणे झाली़ यावेळी प्रमोद पवार, निवृत्ती पवार, सुनील इंगळे, सतीश पवार, शेषराव जाधव, बाळासाहेब लटके, नवनाथ खुळे, सचिन पवळे, आदिनाथ निशाणे, संदीप आढाव,अप्पासाहेब देठे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)