सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:25 IST2021-09-04T04:25:29+5:302021-09-04T04:25:29+5:30

श्रीरामपूर : वडाळामहादेव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विशाल गुलाबराव पवार, तर उपाध्यक्षपदी लीलाबाई नामदेव वालतुरे यांची बिनविरोध निवड ...

As president of a service organization | सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी

सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी

श्रीरामपूर : वडाळामहादेव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विशाल गुलाबराव पवार, तर उपाध्यक्षपदी लीलाबाई नामदेव वालतुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्षे यांचे अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्षपदासाठी पवार यांच्या नावाची सूचना बाळासाहेब कसार यांनी मांडली. त्यास रोहिदास कसार यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी वालतुरे यांच्या नावाची सूचना धनंजय पवार यांनी मांडली. त्यास मारुती खेमनर यांनी अनुमोदन दिले. निवडी प्रसंगी अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष गुलाबराव पवार, संस्थेचे संचालक बाळासाहेब कसार, धनंजय पवार, रोहिदास कसार, नानासाहेब गायकवाड, मारुती खेमनर, आबासाहेब उघडे, भाऊ तेलोरे, उत्तमराव पवार, विनोद मलिक, मीराबाई पवार, रामभाऊ कसार, बाबासाहेब पवार, सुनील कुदळे, माणिकराव पवार, रघुनाथ उघडे, दिलीप पवार उपस्थित होते.

-------

Web Title: As president of a service organization