अध्यक्षांसह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:31+5:302021-05-28T04:16:31+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या टिळकनगर परिसर उद्योग समूहाच्या पगारदार सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह अन्य संचालकांनी लाखो रुपये ...

अध्यक्षांसह
श्रीरामपूर : तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या टिळकनगर परिसर उद्योग समूहाच्या पगारदार सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह अन्य संचालकांनी लाखो रुपये आगाऊ उचलल्याने त्यांच्यावर सहायक निबंधकांनी त्यांना पदावरून निष्प्रभावित केले आहे.
याबाबत संचालक शांतीलाल सोनवणे यांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. आगाऊ पैसे भरण्यासाठी मासिक बैठकीमध्ये आवाज उठवला होता. मात्र, त्याला कोणीही दाद दिली नाही. अखेर सोनवणे यांनी संचालक पदाचा राजीनामा देत सहायक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याची दखल घेत सहकारी अधिनियमान्वये चौकशी आदेश पारित करण्यात आले.
चौकशीत संस्थेच्या अध्यक्षांसह चार संचालक दोषी ठरविण्यात आले. त्यांना उचललेली रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली. मात्र, त्याची पूर्तता न केल्याने अध्यक्ष बाळासाहेब विघे, अनिल जेधे, मीनाबाई चावरे, शोभाबाई बग्गन यांना संचालक पदावरून निष्प्रभावित केल्याचा आदेश पारित करण्यात आला.
---------