आयुक्तांना मैलामिश्रित पाण्याची बाटली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:13+5:302021-07-20T04:16:13+5:30
अहमदनगर : शहरासह उपनगरांत दूषित पाणीपुवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, झेंडीगेट येथील नागरिकांनी सोमवारी आयुक्तांना दूषित पाण्याची बाटली ...

आयुक्तांना मैलामिश्रित पाण्याची बाटली भेट
अहमदनगर : शहरासह उपनगरांत दूषित पाणीपुवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, झेंडीगेट येथील नागरिकांनी सोमवारी आयुक्तांना दूषित पाण्याची बाटली भेट देत गांधीगिरी केली. दरम्यान, आयुक्तांनी स्वच्छ पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन दिले.
शहरातील झेंडीगेट, सुभेदार गल्ली, आंबेडकर चौक, बुडन फौजदारी कॉलनी परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी पालिकेकडे तक्रार केली. परंतु, प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दूषित पाणी एका बाटलीत भरून आणले. ती बाटली आयुक्तांना भेट दिली. तसेच या भागात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी आयुक्त शंकर गोरे यांनी स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. येत्या आठ दिवसांत स्वच्छ पाण्याचा पुरवठा न केल्यास सोमवारी आयुक्तांच्या दालनात नागरिकांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांच्यावतीने देण्यात आला.
.....
सूचना : फोटो १९ महापालिका नावाने आहे.
....
शहरासह उपनगरांतही दूषित पाणी
शहरासह उपनगरांत ड्रेनेज, भुयारी गटार, फुज टू, केबल, यासह अन्य कामे सुरू आहेत. त्यासाठी रस्ते खोदले जात असल्याने जलवाहिन्यांना गळती लागलेली आहे. त्यामुळे शहरात दूषित पाणीपुरवठा होत असून, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे सर्दी, खोकला, पोटदुखीचे रुग्ण वाढत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.