डिकसळचा आराखडा तयार करा

By Admin | Updated: June 30, 2014 00:33 IST2014-06-29T23:15:33+5:302014-06-30T00:33:13+5:30

कर्जत : टंचाईकाळात पाणी व लोकांच्या हाताला काम यांना प्राधान्य द्यावे व दुष्काळातील मॉडेल व्हिलेज म्हणून डिकसळचा आराखडा तयार करा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

Prepare a sketch plan | डिकसळचा आराखडा तयार करा

डिकसळचा आराखडा तयार करा

कर्जत : टंचाईकाळात पाणी व लोकांच्या हाताला काम यांना प्राधान्य द्यावे व दुष्काळातील मॉडेल व्हिलेज म्हणून डिकसळचा आराखडा तयार करा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महसूलमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी पंचायत समिती सभागृहात टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले, मंजूर खेपा रोज १०० टक्के करणे, दुष्काळात ग्रामपंचायतींना वाटप केलेल्या पाण्याच्या टाक्या शोधून त्याद्वारे पाणी देणे, वीजप्रश्न असल्यास टँकर भरण्यासाठी जनरेटरचा वापर, पाणी योजनांचे स्त्रोतांचे बळकटीकरण, बंधारे व तलावातील गाळ काढणे, कामासाठी वृक्षारोपनाचे खड्डे, अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करून जनतेच्या सोयीचे निर्णय घ्यावे तसेच इतर सूचना मंत्री थोरात यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बैठकीस सभापती सोनाली बोराटे, उपसभापती किरण पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फाळके, परमवीर पांडुळे, प्रवीण घुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राजेंद्र देशमुख, काकासाहेब तापकीर, जिल्हाधिकारी अनिल कवडे, अधिकारी हजर होते.
(तालुका प्रतिनिधी)
कामाची शाबासकी देणे कर्तव्य
तालुका टंचाईशी मुकाबला करताना कर्जतचे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी टँकरची मागणी येताच २४ तासात टँकर पाठवून पाणी पुरवठा केला. काम न केल्यास अधिकाऱ्यांकडे सर्वच जण बोट दाखवतात. कामे केल्यावर त्यांना शाबासकी देणे कर्तव्य आहे, असे सांगून महसूलमंत्र्यांनी तहसीलदारांच्या कामाचे कौतुक केले.

Web Title: Prepare a sketch plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.