प्रवरा काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा; २२ हजार क्युसेकने पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 13:28 IST2017-09-20T13:27:54+5:302017-09-20T13:28:53+5:30
अहमदनगर : धरणपाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीत २२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, प्रवरा ...

प्रवरा काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा; २२ हजार क्युसेकने पाणी सोडले
अहमदनगर : धरणपाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे निळवंडे धरणातून प्रवरा नदीत २२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, प्रवरा नदीतून पाण्याचा मोठा लोंढा येणार आहे़ त्यामुळे प्रवरा नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सकाळी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़
प्रवरा काठच्या संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर तालुका तहसीलदारांना याबाबत पत्र देण्यात आले आहे़ तालुक्यातील यंत्रणांना प्रवरा नदीच्या पाण्यात वाढ झाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आले आहेत़ निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात आवक वाढू लागली आहे़ त्यामुळे धरणातून प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले असून, त्यात पुढील काही तासांत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे़