प्रवरा नदीपात्रातून टेम्पोसह तीन ढंपर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST2021-02-07T04:20:18+5:302021-02-07T04:20:18+5:30
नेवासा : शहरातील चिंचबन रस्त्यावरील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एका टेम्पोसह तीन ढंपर नेवासा पोलिसांनी पकडले. यामध्ये ...

प्रवरा नदीपात्रातून टेम्पोसह तीन ढंपर पकडले
नेवासा : शहरातील चिंचबन रस्त्यावरील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एका टेम्पोसह तीन ढंपर नेवासा पोलिसांनी पकडले. यामध्ये सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून काहींनी चोरटी वाळू वाहतूक सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते व पोलीस नाईक राहुल यादव यांना खबऱ्याकडून वाळू चोरीबाबत माहिती मिळाली. त्या दोघांनी चिंचबन रस्त्यावरील प्रवरा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीवर कारवाई केली. एका टेम्पोसह तीन ढंपरांना जागीच अडविले. याप्रकरणी सोमनाथ आसाराम हिवरे, नितीन शंकर कुसळकर (रा. नेवासा) यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, हेडकॉन्स्टेबल तुळशीराम गीते करीत आहेत.