प्रतिभा भैलुमे होणार कर्जतच्या नगराध्यक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 18:45 IST2018-05-18T18:44:37+5:302018-05-18T18:45:31+5:30
प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भैलुमे यांचा एकमेव अर्ज वाजत गाजत मिरवणुकीने मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. मात्र अधिकृत घोषणा बुधवारी होणार आहे.

प्रतिभा भैलुमे होणार कर्जतच्या नगराध्यक्षा
कर्जत : प्रतिभा नंदकिशोर भैलुमे यांची कर्जत नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भैलुमे यांचा एकमेव अर्ज वाजत गाजत मिरवणुकीने मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला. मात्र अधिकृत घोषणा बुधवारी होणार आहे.
मावळते नगराध्यक्ष नामदेव राऊत, उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अंकुश भैलुमे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्यासह मोेठा जनसमुदाय मिरवणुकीत सहभागी झाला होता. ग्रामदैवत संत गोदड महाराजांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मिरवणुकीने जाऊन कर्जत नगरपंचायतीमध्ये अर्ज भरण्यात आला. त्यानंतर सांगता सभा घेऊन मावळते नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
बुधवारी होणार अधिकृत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची घोषणा
नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून निवडून आलेल्या भैलुमे या एकमेव नगरसेविका आहेत. अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. नामदेव राऊत यांचा नगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने या पदासाठी नूतन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवार २३ मे रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे. उपनगराध्यक्ष पदी कोणाला संधी मिळते? याकडे लक्ष लागले आहे.