प्रसाद करणार दिल्लीची हवाई सफर

By Admin | Updated: July 5, 2014 00:30 IST2014-07-04T23:18:50+5:302014-07-05T00:30:35+5:30

अहमदनगर : हवाई सफरीचे स्वप्न प्रत्येकालाच असते परंतु योग येत नाही तशी संधीही मिळत नाही. लहान वयात विमानात बसण्याची संधी मिळण तसं नशीबच पण ‘लोकमत’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या

Prasad will do Delhi's air travel | प्रसाद करणार दिल्लीची हवाई सफर

प्रसाद करणार दिल्लीची हवाई सफर

अहमदनगर : हवाई सफरीचे स्वप्न प्रत्येकालाच असते परंतु योग येत नाही तशी संधीही मिळत नाही. लहान वयात विमानात बसण्याची संधी मिळण तसं नशीबच पण ‘लोकमत’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमाने अहमदनगर शहरातील भिंगार येथील नवीन मराठी हायस्कूल येथे तिसरीत शिकणाऱ्या प्रसाद भालचंद्र साळवे या विद्यार्थ्याला विमानाने मुंबई-दिल्ली- मुंबई या हवाई सफरीची संधी ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिली आहे. येत्या १० जुलैला तो विमानाने दिल्ली गाठणार आहे.
२०१३ या शैक्षणिक वर्षात ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमावर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यभरातून तब्बल २५ लाखांवर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. जवळपास ३००० शाळेच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी प्रत्येकी एका भाग्यवंत विद्यार्थ्याची या सफरीसाठी निवड झाली आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यातून प्रसाद भालचंद्र साळवे याची निवड झाली आहे. शाळेच्या वतीने प्रसाद साळवे याचा सत्कार करताना ‘लोकमत’चा ‘संस्काराचे मोती’ हा उपक्रम प्रेरणादायी असून, चालू सत्रात लोकमतमध्ये सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नवीन मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. ए. पाचंगे मॅडम यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक गोडळकर सर, लोकमतचे आवृत्ती प्रमुख अनंत पाटील, वितरण विभागाचे उपव्यवस्थापक प्रमोद सोनवणे, शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
यंदाही सहभागी व्हा व, हवाई सफरीला जा!
‘लोकमत’मध्ये सुरू असलेल्या ‘‘संस्काराचे मोती’’ तून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. हा उपक्रम अभ्यासमालेसोबत सर्वव्यापी ज्ञानात भर घालणारा आहे. यावर्षी पर्यावरण विषयाला अनुसरून १ जुलै ते ११ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत रोजच्या अंकात ‘ग्रीन किडस्’ हे विशेष पान प्रकाशित करण्यात येत आहे. यात शंभर कूपन प्रकाशित करण्यात येणार असून, यापैकी कोणतेही ८५ कूपन्स प्रवेशिकेत चिकटवून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला हवाई सफरीच्या संधीसह इतर बक्षिसाव्यतिरिक्त सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास हमखास बक्षीस मिळणार आहे. यंदाही २०१४ या वर्षातील उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.
लोकमतमुळे संधी मिळाली
या सत्कारप्रसंगी प्रसाद साळवे या विद्यार्थ्याचे आई-वडील, आजी-आजोबा स्वत: हजर राहून आपल्या मुलाचा सत्कार होताना पाहून भारावून गेले. ‘लोकमत’मुळेच आमच्या मुलास ही हवाई सफर करण्याची संधी मिळाली आहे. लोकमतच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत प्रसाद भाग घेत आला असून, प्रत्येक स्पर्धेतून बक्षीस प्रसादला मिळाले आहे. लोकमतच्या या उपक्रमाचे कौतुक करून लोकमतच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Web Title: Prasad will do Delhi's air travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.