टाईम ट्रायलमध्ये प्रणिता सोमण प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:49+5:302021-02-05T06:30:49+5:30
सायकलिंगच्या विविध स्पर्धांमध्ये प्रणिता सोमण हिने सहभाग घेऊन यापूर्वीही मोठे यश संपादन केले आहे. औरंगाबाद येथे ३१ जानेवारीला झालेल्या ...

टाईम ट्रायलमध्ये प्रणिता सोमण प्रथम
सायकलिंगच्या विविध स्पर्धांमध्ये प्रणिता सोमण हिने सहभाग घेऊन यापूर्वीही मोठे यश संपादन केले आहे. औरंगाबाद येथे ३१ जानेवारीला झालेल्या २० किलोमीटर अंतराच्या टाईम ट्रायल प्रकारात प्रणिता सोमण हिने हे अंतर ३१.४८ मिनिटात पूर्ण केले. तसेच आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या माउंटन टेरेन बाईक म्हणजे डोंगरातून सायकल चालविण्याच्या प्रकारात तिने ३ किलोमीटरचे अंतर १६ मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही स्पर्धेत सोमण हिने मिळविलेल्या यशामुळे कर्नाटक आणि मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तिला सहभागी घेऊन प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे ,प्रताप जाधव, संजय धोपावरकर यांच्या मार्गदर्शनाने सोमण ही सायकलिंगच्या क्षेत्रात यश मिळवत आहे.
---------------
फोटो नेम : ०२ प्रणिता सोमण, संगमनेर