‘लोकमत’ तर्फे प्राणायाम शिबिर
By Admin | Updated: June 15, 2016 23:44 IST2016-06-15T23:43:55+5:302016-06-15T23:44:29+5:30
अहमदनगर : लोकमत व योग विद्याधाम, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १७ जून ते २१ जून दरम्यान प्राणायाम व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकमत’ तर्फे प्राणायाम शिबिर
अहमदनगर : लोकमत व योग विद्याधाम, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १७ जून ते २१ जून दरम्यान सकाळी ७ ते ८ या वेळेत जीवनशैलीत आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे ज्ञानसूत्र देणाऱ्या प्राणायाम व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून शिबिरात योग, ध्यान व प्रणायामाबद्दल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पंधरा वर्ष वयोगटावरील कोणतीही व्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकणार असून शिबिरास येताना सोबत सतरंजी व बेडशीट आणावे. सैल कपडे परिधान करून यावेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, असे शिबिराचे तत्व असून इच्छुकांनी शिबिराच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्रनिहाय निर्धारीत वेळेत उपस्थित रहावे. योगप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिबिराचे केंद्रनिहाय वेळापत्रक :
योगभवन - भिस्तबाग रोड, चिंतामणी कॉलनी, सावेडी. जालिंदर झावरे, ९४२२०८४९६६, आनंदी बाजार - वरद हॉल, शुभांगी माळी, ९४२०६४१५७९, गुलमोहर रोड - नवलेनगर, स्वाती ठाकूर, ९४०३३७३०९६, बुरूडगाव रोड - नक्षत्र लॉन्स, जयश्री पाटील ९४२३२०५९२६, बुऱ्हाणनगर - बाणेश्वर कॉलनी, राम मंदिराजवळ नाबरिया यांचे निवासस्थान, किशोर फिरोदिया, ९४०५०००८००, ललिता कटारिया, ९९२१२५३२९३.