प्रकाश गरड यांची रेल्वेखाली आत्महत्या

By Admin | Updated: April 11, 2016 00:43 IST2016-04-11T00:27:47+5:302016-04-11T00:43:42+5:30

अहमदनगर : निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश लक्ष्मण गरड (वय ५९, रा. टी. व्ही. सेंटरजवळ, सावेडी) यांचा रविवारी दुपारी तीन वाजता दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

Prakash Garad's suicide by rail | प्रकाश गरड यांची रेल्वेखाली आत्महत्या

प्रकाश गरड यांची रेल्वेखाली आत्महत्या

अहमदनगर : बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश लक्ष्मण गरड (वय ५९, रा. टी. व्ही. सेंटरजवळ, सावेडी) यांचा रविवारी दुपारी तीन वाजता दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
गरड यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. दरम्यान, गरड यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव रविवारी रात्रीच नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्या मृत्युचे नेमके कारण काय आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत. गरड हे विद्यार्थीप्रिय अध्यापक होते. त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते. फिरोदिया शाळेच्या प्रगतीमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. गरड यांच्या निधनाने शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prakash Garad's suicide by rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.