प्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 14:30 IST2019-12-30T14:30:29+5:302019-12-30T14:30:35+5:30

 राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपरे यांना सोमवाकी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तनपुरे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जवळचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत.

Prajakat Tanpure takes oath as Minister of Stateँँप्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ | प्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

प्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ

अहमदनगर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपरे यांना सोमवाकी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तनपुरे हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जवळचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहेत. प्राजक्त यांचे आजोबा हेही आमदार राहिलेले आहेत, तसेच वडील प्रसाद तनपुरे हेही २५ वर्षे आमदार व एकवेळा खासदार होते. त्यामुळे तनपुरे यांना राजकीय वारसा आहे. राहुरीला तनपुरे यांच्या रुपाने दुसºयांदा मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. उच्चविद्याविभूषित असलेले तनपुरे हे सध्या राहुरीचे नगराध्यक्ष आहेत.
: महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात नेवासा मतदारसंघाचे शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव यशवंतराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गडाख यांच्यारुपाने नेवासा विधानसभा मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख हे दोन कॅबिनेट मंत्री ्रतर तनपुरे हे राज्यमंत्री असे तीन मंत्री मंत्रीमंडळात राहणार आहे. तीन पदांमुळे राज्याच्या राजकारणातही जिल्ह्याचे पारडे जड झाले आहे.

Web Title: Prajakat Tanpure takes oath as Minister of Stateँँप्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ