कामगारांच्या आंदोलनाला ‘प्रहार’चा संघटनेचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST2021-09-05T04:26:06+5:302021-09-05T04:26:06+5:30
शुक्रवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी कारखानास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी कामगारांशी चर्चा केल्यानंतर शासकीय स्तरावर कामगार आयुक्त, ...

कामगारांच्या आंदोलनाला ‘प्रहार’चा संघटनेचा पाठिंबा
शुक्रवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी कारखानास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. यावेळी कामगारांशी चर्चा केल्यानंतर शासकीय स्तरावर कामगार आयुक्त, भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त, विविध शासकीय अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून कामगारांचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, अशी मागणी केली. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला तर त्यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्यातंर्गत निलंबनाची कार्यवाही करावी अशीही मागणी परदेशी यांनी केली. जोपर्यंत कामगारांचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत प्रहार जनशक्ती पक्ष या आंदोलन सक्रिय सहभागी राहणार असल्याचे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष देवीदास येवले, जिल्हा संघटक नितीन पानसरे, राहुरी तालुका प्रमुख प्रशांत पवार, सुरेश लांबे, श्रीराम शिंदे, लहानू तमनर आदी उपस्थित होते.
-----------
फोटो ०४ प्रहार
ओळी- थकीत वेतनासाठी डॉक्टर बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा देत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी कामगारांशी चर्चा केली.