प्रहार कार्यकर्त्यांनी दिव्यांगाला बांधून दिले घरकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:21+5:302021-07-07T04:27:21+5:30
अहमदनगर : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिरजगाव येथे एका दिव्यांगाला घरकुल बांधून दिले. दरवर्षी ...

प्रहार कार्यकर्त्यांनी दिव्यांगाला बांधून दिले घरकुल
अहमदनगर : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिरजगाव येथे एका दिव्यांगाला घरकुल बांधून दिले.
दरवर्षी प्रहारचे कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू, वंचितांना घरकुलाची भेट देत असतात. मागील वर्षी नगरमध्ये एका अपंगाला घरकूल बांधून देण्यात आले होते. आता कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रामदास पानपट या दिव्यांगास प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून घरकुल बांधून देण्यात आले. मागील वर्षी कर्जत येथे राज्यमंत्री कडू यांचा दौरा असताना रामदास पानपट यांनी बच्चू कडू यांच्याजवळ आपली व्यथा मांडली. बच्चू कडू यांनी याची तत्काळ दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते संतोष पवार, जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक विनोदसिंग परदेशी यांच्या कानावर ही बातमी घातली. त्याची वचनपूर्ती करत पवार, परदेशी, तसेच प्रहार कार्यकर्त्यांनी अखेर या दिव्यांगास घरकुल बांधून दिले. याकामी मोलाची भूमिका बजावणारे राजेंद्र गोरे आणि बबनराव म्हस्के यांनी फक्त दहा दिवसांमध्ये हे घर पूर्णत्वास नेले. यावेळी मिरजगाव येथील सरपंच खेतमाळीस यांचे सहकार्य लाभले.
यावेळी प्रहारचे जिल्हा सचिव प्रकाश बेरड, जिल्हा सल्लागार मालोजी शिकारी, जिल्हा उपाध्यक्ष पप्पूशेठ येवले, जिल्हा उपाध्यक्ष वामन भदे, कर्जत तालुकाध्यक्ष सागर निकत, जामखेड तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर, नगर तालुकाध्यक्ष भगवान भोगाडे, आदी उपस्थित होते.
--------------
फोटो - ०६प्रहार मंजिल
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिरजगाव येथील रामदास पानपट या दिव्यांगास घरकुल बांधून दिले.