प्रज्ञाशोध परीक्षेचे केंद्र आता ढोकेश्वर विद्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:09+5:302020-12-17T04:45:09+5:30

टाकळी ढोकेश्वर : चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी या हेतूने शिक्षण विभागाने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील ...

Pragya Shodh examination center is now at Dhokeshwar Vidyalaya | प्रज्ञाशोध परीक्षेचे केंद्र आता ढोकेश्वर विद्यालयात

प्रज्ञाशोध परीक्षेचे केंद्र आता ढोकेश्वर विद्यालयात

टाकळी ढोकेश्वर : चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी या हेतूने शिक्षण विभागाने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर विद्यालयात राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे केंद्र सुरू केले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे व विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी दिली. या अगोदर या परिक्षेसाठी अहमदनगला जावे लागल असे. परीक्षेसाठी पारनेर तालुक्यातील ३२२ विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून बसले होते. टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आले. या परीक्षेसाठी संदीप बांडे, योगेश धुमाळ यांच्यासह विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-------

फोटो ‌ओळी - टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी केंद्र सुरू करण्यात आले.

Web Title: Pragya Shodh examination center is now at Dhokeshwar Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.