बिल भरण्याचा शब्द देताच वीजपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:30 IST2021-02-26T04:30:29+5:302021-02-26T04:30:29+5:30
श्रीगोंदा : यंदा कुकडी कालव्याचे पाणी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे विहिरी, बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर होतेे. अशा परिस्थितीत ...

बिल भरण्याचा शब्द देताच वीजपुरवठा सुरळीत
श्रीगोंदा : यंदा कुकडी कालव्याचे पाणी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे विहिरी, बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर होतेे. अशा परिस्थितीत महावितरणने थकीत वीजबिलाच्या नावाखाली रोहित्र बंद केेेेली होती. मात्र
थकीत वीजबिल भरण्याचा शेतकऱ्यांनी शब्द देताच महावितरणने श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा, खरातवाडी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.
ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर यांनी महावितरणचे शाखाधिकारी सिंग यांना पिंपळगाव परिसरातील रोहित्र त्वरित सुरू करावा. तीन दिवसांत थकित वीजबिलाची काही रक्कम आम्ही अदा करू, असा शब्द शेतकऱ्यांच्या वतीने दिला होता. त्यानुसार सिंग यांच्या आदेशानुसार वायरमन जाधव यांनी त्याच दिवशी रोहित्र सुरू केले. सर्व शेतकऱ्यांना एकत्रित बसून वीजबिल रक्कम भरावी, असा प्रस्ताव मांडला. शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ते मान्य केले. हे रोहित्र वापरणारे शेतकरी एकत्र आले. त्यांनी काही रक्कम जमा केली. ती रक्कम संबंधितांकडे वीजबिल भरण्यासाठी दिली.
यावेळी अध्यक्ष सुरेश भापकर, बाळासाहेब औटी, अण्णासाहेब औटी, मच्छिंद्र पंधरकर, युवराज भापकर, मारुती भापकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांचे आभार मानले.