शेवगाव तालुक्यातील वीजपुरवठा त्वरित सुरू करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST2021-09-06T04:26:13+5:302021-09-06T04:26:13+5:30
शेवगाव : तालुक्यातील जोहरापूर, खामगाव, हिंगणगावचा महापुरामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या ...

शेवगाव तालुक्यातील वीजपुरवठा त्वरित सुरू करावा
शेवगाव : तालुक्यातील जोहरापूर, खामगाव, हिंगणगावचा महापुरामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन वीज वितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. एम. लोहारे यांना देण्यात आले आहे. यावेळी ॲड. शिवाजीराव काकडे, मोशीम पटेल, अनुमुद्दिन पटेल, विकारोद्दीन काझी, मोहीद्दीन पटेल, बिलाल काझी, आसिफ पटेल, बाबासाहेब देवडे आदी उपस्थित होते.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही गावांत ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री ढगफुटीसदृश पावसाने नद्यांना महापूर येऊन पाणी काही गावांमध्ये शिरले होते. महापुरामुळे जोहरापूर, हिंगणगाव व खामगाव आदी गावांमधील विद्युतपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. गेल्या चार दिवसांपासून ही गावे अंधारात आहेत. वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले. विद्युत पुरवठा बंद असल्याने जनावरांना, माणसांना पिण्यासाठी पाणी नाही, घरात पीठ नाही. लोकांनी जगायचे कसे? असा प्रश्न आहे. त्यामुळे वीज वितरण मंडळाने याची दखल घेऊन वरील तीन गावांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.